Close

धाराशिव केवस - उस्मानाबाद

दिशा
श्रेणी ऐतिहासिक, धार्मिक

उस्मानाबाद लेणी – ऐतिहासिक पार्श्वभूमी :

उस्मानाबाद शहरापासून अवघ्या आठ कि.मी. अंतरावर एक प्राचीन लेणी आहे. उपलब्ध कागदपत्रावरून हि लेणी ७ व्या शतकातील असावी. हि गुहा नील व महानील नावाच्या दिद्याधारांनी निर्माण केली होती. पहिली लेणी पश्चिमेला लहान व अपूर्ण अवस्थेत आहे. त्यांच्या बाजूला दुसरी लेणी आहे. त्यात सुमारे ८० १० व्हरांडा असून त्याचे छत ३२ खांबानी पेलून धरले आहे. आतील बाजूस पार्श्वनाथाची भव्य मूर्ती आहे. प्रवेशद्वाराजवळ पाण्याचे कुंड असून त्यात बारमाही स्वच्छ व गार पाणी असते.

कसे पोहोचाल?:

रस्त्याने

जिल्ह्याचे मुख्यालय उस्मानाबादपासून 6.5 किमी लांब आणि लातूरपासून 85.2 किलोमीटर अंतरावर आहे.