Close

परंडा फोर्ट - परंडा

दिशा
श्रेणी ऐतिहासिक, धार्मिक

कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिमंडा (परंडा)हा एक महत्वाचा परगणा होता. तेथील किल्ला हा ३५ मिटर लांब तेवढाच रुंद आहे. बहामनी राजवटीत मुहमदशहा बहामनीचा पंतप्रधान महमूद गवान याने तो बांधला इ.स. १६०० च्या सुमारास हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर १६२८ साली शहाजी राजांनी तो ताब्यात घेतला व दोन वर्षे तो त्यांच्या ताब्यात होता. इ.स. १६३० मध्ये तो विजापूरच्या आदिलशाकडे गेला. त्यांच्याच मुरार नावाच्या सेनापतीने या किल्ल्यातील प्रसिद्ध मुलुखमैदान तोफ १६३२ साली विजापूर येथे नेली.

कसे पोहोचाल?:

रस्त्याने

जिल्ह्याचे मुख्यालय उस्मानाबादपासून 75 किमी लांब आणि लातूरपासून 127.5 किलोमीटर अंतरावर आहे.