Close

सांस्कृतिक ओळख – धाराशिव जिल्हा

धाराशिव जिल्हा तोंडओळख

धाराशिव जिल्हा तोंडओळख

धाराशिव जिल्हा दक्षिण पठाराच्या क्षेत्रात येतो, मराठवाडा विभागाच्या अतिदक्षिणेकडे १७. ३५ आणि १८.४० उत्तर अक्षाश व ७५.१६ आणि ७६.४० पूर्व रेखांशावर हा जिल्हा वसलेला आहे. सविस्तर वाचा…

ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे

ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे

या जिल्ह्यात काही प्राचीन व ऐतिहासिक महत्व असलेली स्थळे आहेत. त्यात प्रामुख्याने  धाराशिव लेणी, रोमन साम्राज्याशी व्यापारी संबंध असलेले तेर, महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरचा तुळजाभवानी, कुंथलगिरी हे जैनांचे पवित्र सिध्द क्षेत्र. मध्ययुगात महत्वाची भूमिका बजावणारे नळदुर्ग व परंडा येथील किल्ले. सविस्तर वाचा…

धारासूरमर्दिनी

धारासूरमर्दिनी

पौराणिक कथा प्रमाणे गावात धारासूर नावाचा असुर राहत होता. त्यावरून या शहरास धाराशिव नाव पडले असावे. याचा वध देवीने केला त्यामुळे तिचे नाव धारासूरमर्दिनी पडले. येथे तिचे धारासूरमर्दिनी रूपातील मंदिर असून  तुळजापूर महात्म्यात याचा उल्लेख.सविस्तर वाचा…

हिंगळजवाडीची हिंगळाजदेवी

हिंगळजवाडीची हिंगळाजदेवी

धाराशिव- तेर रस्त्यावर धाराशिव पासून साधारणपणे २० कि.मी. अंतरावर हिंगळजवाडी नावच्या गावामध्ये अगदी रस्त्यालगत हिंगळाजदेवीचे मंदिर आहे. प्राचीन भारतातील ५१ शक्तीपिठामध्ये हिंगळजदेवीचा समावेश होत असून या देवीचे मुख्य स्थान हे पाकिस्तानातील कराची शहराजवळ आहे.   सविस्तर वाचा…

कै. रामलिंगअप्पा लामतुरे संग्रहालय - तेर

कै. रामलिंगअप्पा लामतुरे संग्रहालय - तेर

आपल्या प्राचीन वारशाबद्दल आत्मीयता असणारे तेर येथील रहिवासी कै. रामलिंगअप्पा खंडाप्पा लामतुरे व त्यांचे चिरंजीव श्री. भागवतअप्पा यांना तेर येथे सापडलेल्या पुरातन वस्तुंच्या संग्रहामुळे तेरचा प्राचीन इतिहास जिवंत राहिला असून या संग्रहाची ख्याती भारताबरोबरच परदेशातही झाली आहे. सविस्तर वाचा…

धाराशिव लेणी-धाराशिव

धाराशिव लेणी-धाराशिव

धाराशिव शहराच्या ईशान्येस सहा कि.मी. अंतरावरील टेकडीवरील सात लेण्यांचा समूह आहे. हा शैलगृह समूह धाराशिव लेणी म्हणून ओळखला जातो.

सविस्तर वाचा…

जागजी येथील महालक्ष्मी मंदिर

जागजी येथील महालक्ष्मी मंदिर

जागजी हे गाव उस्मानाबाद जिल्ह्याच्या ठिकाणापासून ३२ कि.मी. अंतरावर असून ‘तगर’ या प्राचीन नगरीच्या परिसरात वसलेले आहे. येथे महालक्ष्मी मंदिर असून या मंदिराच्या शिल्प पट्टीतील देवताचक्र मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचे ठरते. सविस्तर वाचा…

संत गोरोबाकाकांचा मठ

संत गोरोबाकाकांचा मठ

महाराष्ट्रात भागवत धर्माचे तत्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचे महत्वाचे कार्य वारकरी पंथाने केले आहे. भगवत भक्तीची महती सांगणाऱ्या वारकरी संप्रदायाची जन्मभूमी म्हणजे मराठवाडा आणि या मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात भागवत धर्माची पताका फडकावली ती तेरच्या संत गोरोबा कुंभार यांनी. सविस्तर वाचा…

हातलाई देवी मंदिर

हातलाई देवी मंदिर

उस्मानाबाद शहराजवळील एक नयनरम्य परिसर म्हणून सध्या हातलाईदेवी मंदिराकडे पहिले जाते. उस्मानाबाद- बार्शी रस्त्यावर शहरापासून तीन कि.मी. अंतरावर बार्शीकडे जाताना डाव्या हाताला एक उंच डोंगर माथ्यावर हातलाईचे मंदिर आहे.

सविस्तर वाचा…

रामलिंग ता. उस्मानाबाद

रामलिंग ता. उस्मानाबाद

उस्मानाबादपासून २२ कि.मी.  अंतरावर उत्तरेस सोलापूर -धुळे या राष्ट्रीय महामार्गालगत (रा. म. २११ ) येडशी या रेल्वे स्थानकाजवळ रामलिंग देवस्थान आहे. इथल्या वैशिष्ट्यपूर्ण भूरचनेमुळे या स्थानाला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हंटले जाते.

सविस्तर वाचा…

उपळा येथील त्रिकुटेश्वर, सिद्धेश्वर मंदिर (ता. उस्मानाबाद )

उपळा येथील त्रिकुटेश्वर, सिद्धेश्वर मंदिर (ता. उस्मानाबाद )

उस्मानाबादपासून १०  कि.मी.  अंतरावरील उपळा हे गाव माकडाचे उपळा म्हणूनही ओळखले जाते. या गावातील त्रिकूटेश्वर व सिद्धेश्वर मंदिर प्रसिद्ध आहेत.  सविस्तर वाचा…

हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी दर्गा

हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी दर्गा

येथे सुफी संत  हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी  यांचा दर्गा असून रजाब महिन्यात (एप्रिल-मे) दरवर्षी येथे उरूस भरतो.

सविस्तर वाचा…

तेर

तेर

उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ईशान्येला २५ किमी अंतरावरील तेर हे गाव १८० १९ उत्तर अक्षांश व ७६० ९‘ पूर्व रेखांशावर तेरणा नदीच्या काठावर वसलेले असून समुद्रसपाटीपासून दोन हजार फूट उंचीवर आहे. संत गोरा कुंभार यांचा गाव म्हणून तेर प्रसिद्ध आहे. सविस्तर वाचा…

वडगाव सिद्धेश्वर (ता. उस्मानाबाद)

वडगाव सिद्धेश्वर (ता. उस्मानाबाद)

उस्मानाबाद या जिल्हयाच्या ठिकाणापासून ८ कि. मी. अंतरावर असलेले वडगाव असून या गावच्या पश्चिमेस उस्मानाबाद – वडगाव रस्त्यापासून एक फर्लांगावर सिद्धेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. सविस्तर वाचा…

अणदुर

अणदुर

अणदुरचे प्राचीन नांव “आनन्दुर” असुन “आनंदपूर” या संस्कृत नावाचे कानडी रुप आहे.कल्याणच्या चालूक्य राजवटीत हे प्रशासकीय मुख्यालय असून चालुक्य सम्राट सहाव्या
विक्रमादित्याचा पुत्र म्लिकार्जुन हा या विभागाचा प्रशासक होता. तथील शिलालेखात त्याने माणकेश्वर मंदिरास दिलेल्या दानांची नोंद आहे.        सविस्तर वाचा…

सावरगाव

सावरगाव

उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणाहून ३१ कि.मी. अंतरावर तळजापुर – सोलापुर रस्त्यावर सरत गावालगत दिगंबर जैन पंथीयांचे सावरगाव हे क्षेत्र आहे. या गावाला १े१व्या,१२व्या शतकामध्ये विशेष महत्व होते. हे येथे मिळालेल्या कदंब महामंडलेश्वर मरुडदेव राणक यांच्या सप्टेबर ११६४च्या कोरीव शिलालेखावरून स्पष्ट होते.  सविस्तर वाचा…

काटी (ता. तुळजापूर)

काटी (ता. तुळजापूर)

तुळजाभवानीचा १४ व्या शतकातील उल्लेख असलेला काटी येथील प्राचीन शिलालेख. तुळजापूर तालुक्यातील काटी (सावरगाव) गावात १४ व्या शतकातील एक शिलालेख सापडला असून तो
मारुती मंदिराच्या भिंतीत बसवलेला आहे. तुळजाभवानीचा उल्लेख असणारा हा सर्वात पहिला संदर्भ असून जवळपास २७ ओळीत यावर लिहिलेली माहिती याप्रमाणे आहे. सविस्तर वाचा…

श्री. क्षेत्र तुळजापूर

श्री. क्षेत्र तुळजापूर

महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठातले आद्यपीठ श्री. क्षेत्र तुळजापूर असून तुळजापुरची अधिष्ठात्री देवी श्री. तुळजाभवानी ही महिषमर्दिनी दुर्गेच्या रुपात आहे.  ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोसले घराण्याची ती कुलदेवता आहे.. सविस्तर वाचा…

किल्ले नळदुर्ग

किल्ले नळदुर्ग

उस्मानाबाद (धाराशिव) या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ५७ कि.मी. अंतरावर आग्नेय दिशेस असून १९०४ पर्यंत हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होते. मुंबई-पुणे-सोलापूर- हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावरील हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ६७० मीटर उंचीवर आहे.हा किल्ला दोन वेगवेगळ्या कालखंडात दोन वेगळ्या शासकांनी बांधला . सविस्तर वाचा…

रामवरदायिनी

रामवरदायिनी

रावणाचा वध करण्यासाठी रामाला वर देणारा ती रामवरदायिनी. रामवरदायिनी हे महिषमर्दिनीचेच एक रुप असून तुळजाभवानी मंदिराच्या उत्तरेला एका डोंगरकड्यावर
रामवरदायिनीचे मंदिर पूर्वाभिमुख असले तरी देवीची मूर्ती दक्षिणाभिमुख असून आपल्या बोटाने दिशा दर्शविताना स्पष्टपणे जाणवते. सविस्तर वाचा…

रामतीर्थ

रामतीर्थ

नळदुर्ग पासून साधारणतः दीड कि.मी. अंतरावर बोरी नदीकाठी बसलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच रामतीर्थ असून येथे राम, हनुमान व महादेवाची मंदिरे आहेत. येथे एक कुंड आहे. आनंद रामायणात नमुद केल्याप्रमाणे ही मंदिरे राम वनवासात असताना रामाने बांधली आहेत. याचा पुरावा म्हणून एका दगडावरील रामाच्या पावलांचे ठसे आजही दाखविले जातात.सविस्तर वाचा…

शहादत्त आलमप्रभू समाधी स्थान

शहादत्त आलमप्रभू समाधी स्थान

छोटाश्या टेकडीवर श्री. आलमप्रभू समाधीचे जागृत देवस्थान आहे.

सविस्तर वाचा…..

ईटचे बेलेश्वर मंदिर

ईटचे बेलेश्वर मंदिर

भूम तालुक्यातील ईट या गावाजवळ  वैशिष्टयापूर्ण एतिहासिक बेलेश्वर मंदिर आह

सविस्तर वाचा…..

कुंथलगिरी जैन मंदिर

कुंथलगिरी जैन मंदिर

औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील सरमकुंडी फाट्यापासून डाव्या बाजूला जाणाऱ्या रस्त्यावर 2. कि.मी. अंतरावर डोंगर माथ्यावर वसलेले कुंथलगिरी गाव आहे. हे दिगंबर पंथीय जैन लोकांचे तीर्थक्षेत्र आहे.  सविस्तर वाचा..

माणकेश्वर मंदिर

माणकेश्वर मंदिर

उस्मानाबाद जिल्यातील वास्तुकलेचा नमुना म्हणजे सुंदर कलाकृतींनी युक्त असे माणकेश्वाराचे शिवमंदिर होय.

सविस्तर वाचा…

डोमगावचा मठ

डोमगावचा मठ

डोमगाव हे उस्मानाबाद पासून ८१ कि.मी. अंतरावर दक्षिण दिशेस परंडा-करमाळा रस्त्यावर सीना नदीच्या तीरावर वसलेले गाव आहे. या ठिकाणी रामदासशिष्य श्री. कल्याणस्वामीचे समाधीस्थळ किंवा मठ आहे. समर्थ रामदास स्वामींचे शिष्य कल्याणस्वामी गुरूआज्ञेप्रमाणे डॉजा, डोमगाव, परंडा येथे राहिले. .सविस्तर वाचा…

श्री. क्षेत्र सोनारी

श्री. क्षेत्र सोनारी

उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ८२ कि.मी. अंतरावर दक्षिण दिशेस असलेले सोनारी हे गाव भैरवनाथाच्या मंदिरासाठी प्रसिध्द आहे. समर्थ रामदासांचे शिष्य कल्याणस्वामी यांनी लिहिलेल्या भैरवनाथ महात्म्यात याचा उत्लेख आहे.   सविस्तर वाचा…

जवळा (ता. परंडा)

जवळा (ता. परंडा)

उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून कि. मी अंतरावर परंडा तालुक्याच्या सिमेवरील गाव असून हे स्थान जवळा निजामुद्दीन म्हणूनही ओळखले जाते. पूर्वी संपूर्ण गावाला संरक्षक भिंत होती व तीन मोठी प्रवेशद्वारे होती. गावामध्ये एक यादवकालीन मंदिर असून या परिसरात केशवराजाची मूर्ती मिळाली आहे. सविस्तर वाचा…

किल्ले परंडा

किल्ले परंडा

उस्मानाबाद जिल्ह्याच्या ठिकाणापासून ६७ कि. मी. अंतरावर दक्षिण दिशेस समुद्रसपाटीपासून ५३० मीटर उंचीवर हा किल्ला आहे. सीना नदीव्या खोऱ्यात परंडा तालुक्याचे ठिकाण असून मराठवाड्याच्या भूमीवरील भक्कम व लष्करीदष्ट्या उत्कृष्ट अशा किल्ल्यांमध्ये परंडा किल्ल्याची गणना केली जाते.   सविस्तर वाचा…

परंडा हजरत ख्वाजा बद्रोद्दीन शहीद चिश्ती दर्गा

परंडा हजरत ख्वाजा बद्रोद्दीन शहीद चिश्ती दर्गा

हिंदू-मुस्लीम  ऐक्याचे प्रतीक असलेला दर्गा हजरत ख्यावाजा बद्रोद्दीन शहीद चिश्ती या सुफी संताचा आहे. दरवर्षी परंडा येथे त्यांच्या स्मरणार्थ उरूस साजरा केला जातो. सन १९९८ साली
त्यांचा ६७७ वा उर्स साजरा केला गेला. सविस्तर वाचा…

अचलबेट

अचलबेट

उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणाहुन १०४ कि.मी. अंतरावर आग्नेय दिशेस तुरोरीजवळ असलेले अचलबेट हे मुंबई-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावर आहे. अचलबेट हे गावाचे नाव नाही तर ती एक उंच डोंगरासारखी टेकडी आहे.   सविस्तर वाचा…

तालमोड(ता. उमरगा येथील महादेव मंदिर)

तालमोड(ता. उमरगा येथील महादेव मंदिर)

उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ११५ कि. मी. अंतरावर तलमोड हे गाव आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवरील पुणे-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गालगतले तलमोड़ उमरगा तालुक्यात आहे. सविस्तर वाचा..

कसगी

कसगी

या मंदिराचे गर्भगृह २.७ चौरस मीटर आकाराचे या असून या मंदिराची बाह्य रचना इस्लामी स्थापत्याप्रमाणे आहे. गर्भगृहाचे छत गोलघुमटा प्रमाणे आहे. त्यावर नंतरच्या काळात पितळी कळस बसविल्याचे दिसून येते याच्या गोलाकार घुमटाच्या चारी बाजूस चार मिनार आहेत. सविस्तर वाचा…

उमरगा येथील शिवमंदिर

उमरगा येथील शिवमंदिर

उस्मानाबाद पासून १०० कि. मी. अंतरावर उमरगा हे तालुक्याचे मुख्यालय असून महाराष्ट्र व कर्नाटकच्या सरहद्दीजवळील उत्तर चालुक्यांची राजधानी कल्याण (बसवकल्याण) पासून ४५ कि. मी. अंतरावर आहे. उमरगा येथील बसस्थानकापासून जवळच असलेले शिवमंदिर चालुक्यकाळातील असून याचा आकार तारकाकृती आहे.. सविस्तर वाचा…

मुरूम

मुरूम

नवव्या शतकातील राष्ट्रकुटांच्या ताम्रपटात मुरुमचा अभिलेखीय उल्लेख सापडतो. त्यात ‘मुरुम्ब हे विभागाचे मुख्य केंद्र होते. ११ व्या १२ व्या शतकातील कल्याणच्या चालुक्यांच्या शिलालेखात मुरुमचा ‘मोरम्बपूर’ असा उल्लेख आहे. . सविस्तर वाचा…

नारंगवाडी (ता. उमरगा)

नारंगवाडी (ता. उमरगा)

नारंगवाडी येथे एक महादेव मंदिर आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून गर्भगृह, अंतराळ आणि समोरच लागून असलेला नंदिमंडप, अशी या मंदिराची रचना आहे. या मंदिरात दोन
हळेकन्नड भाषेतील शिलालेख आहेत. मंदिराचा बाह्यभाग एकदम साधा आहे..सविस्तर वाचा…

अचलेर येथील मल्लिकार्जुन मंदिर

अचलेर येथील मल्लिकार्जुन मंदिर

अचलेर हे गाव उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ७७ कि. मी. अंतरावर अग्नेय दिशेस आहे. या गावाच्या बाहेरील जळकोट -आलुर रस्त्यावर  असलेले मल्लिकार्जुन म्हणून ओळखले जाणारे एक शिवमंदिर आहे. सविस्तर वाचा…

अचलेर- आचीनाथ मंदिर

अचलेर- आचीनाथ मंदिर

अचलेर गावाच्या दक्षिणेस श्री. अचलनाथाचे पुरातन मंदिर आहे. यालाच विठ्ठल -रखुमाईचे मंदिर असे म्हटले जाते.

सविस्तर वाचा…

नागोबा-मंदिर, नागूर(ता. लोहारा)

नागोबा-मंदिर, नागूर(ता. लोहारा)

उस्मानाबाद जिल्ह्याच्या ठिकाणापासून ५६ कि. मी. अंतरावर असणाऱ्या नागूर या ठिकाणी नागोबा मंदिर म्हणून ओळखले जाणारे शिवमंदिर आहे.

सविस्तर वाचा…

येरमाळा, श्री. येडाई- येडेश्वरी देवी

येरमाळा, श्री. येडाई- येडेश्वरी देवी

उस्मानाबाद जिल्ह्याच्या ठिकाणापासून३४ कि.मी.अंतरावर वायव्य दिशेस धुळे -सोलापूर (एन एच-२११) या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या येरमाळा या ठिकाणी येडेश्वरी देवीचे प्राचीन मंदिर असून ते ‘येडाई’ या नावाने ओळखले जाते. देवी पार्वतीच्या सन्मानार्थ हे मंदिर बांधले गेले आहे.  सविस्तर वाचा…

देशमुखांची हावेली

देशमुखांची हावेली

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी हे तालुक्याचे ठिकाण असून सोलापूर-धुळे या रस्त्यापासन साधारणपणे ५ कि.मी. वर आहे. पेशवे-निजाम कालखंडात वाशीला ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे स्थान असून या ठिकाणचे कवडे-देशमख हे निजामकालीन मोठे जहागीरदार म्हणून प्रसिध्द होते. सविस्तर वाचा…

मार्गदर्शक

मा. ना. श्री. शंकरराव गडाख 

मंत्री, मृद व जलसंधारण तथा पालकमंत्री,उस्मानाबाद

संकेतस्थळ संकल्पना

श्री. कौस्तुभ दिवेगावकर (भा.प्र.से.)

जिल्हाधिकारी, उस्मानाबाद

लेखन मंडळ सदस्य

डॉ. सतीश कदम

इतिहास विभाग प्रमुख, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय , तुळजापूर.

डॉ. सुनिल पुरी

इतिहास विभाग प्रमुख, श्री. कुमारस्वामी महाविद्यालय, औसा

डॉ. जयश्री कुलकर्णी (देशमुख)

इतिहास विभाग प्रमुख, व्यंकटेश महाजन महाविद्यालय, उस्मानाबाद

मुद्रण दोष शोधक

प्रा. डॉ. प्रशांत गुणवंत चौधरी

मराठी विभाग प्रमुख, व्यंकटेश महाजन महाविद्यालय, उस्मानाबाद

छायाचित्र व नकाशे

इको-व्हिजन

वजीराबाद, नांदेड

मुखपृष्ठ, मांडणी व सजावट

जिनिअस ॲड-मिशन, पुणे